Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण नाका परिसरातील रहिवासी असलेले रमाकांत महादेव माळवदे (वय ८३ वर्षे) यांचा मंगळवारी दुपारी चक्कर येऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोखले नाका येथील एका दुकानात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रमाकांत माळवदे यांचे मंगळवारी सकाळपासून पोट खराब असल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ते दूध आणण्यासाठी राधाकृष्ण नाका येथील आपल्या राहत्या घरातून गोखले नाका येथील संसारे यांच्या दुकानात गेले होते.

banner 728x90 banner 728x90

दुकानात असतानाच त्यांना अचानक चक्कर आल्यासारखे वाटू लागले. ही बाब लक्षात येताच दुकानदाराने त्यांना बसण्यासाठी टेबल दिले आणि पिण्यासाठी पाणीही दिले. मात्र, त्याच वेळी माळवदे यांना पुन्हा चक्कर आली आणि ते जागीच कोसळले.


घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माळवदे यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांना रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून सायंकाळी ४ वाजता ‘उपचारापूर्वीच मयत’ घोषित केले.


या घटनेची माहिती त्यांच्या नातवाने दिल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *