लांजा येथे एका ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी आशितोष अनिल जाधव (वय २०, रा. लांजा) असे जन्मठेप सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि २२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अल्पवयीन मुलीवरील या गुन्ह्याला न्यायालयाने गांभीर्याने घेत कठोर शिक्षेचा आदेश दिला.
११ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. शाळा सुटल्यानंतर पीडिता दोन सहाध्यायी मुलांसोबत घरी परतत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने जाण्यास भाग पाडले. घाबरलेल्या अवस्थेत ती दोन्ही मुले निघून गेल्यानंतर आरोपीने पीडितेचा जबरदस्तीने हात पकडून तिला जवळील शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजूस ओढत नेले आणि अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली.
घरी परतल्यानंतर मुलगी भयभीत अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी धीर देत चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ए) (बी), ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, ९ (एम), १० नुसार गुन्हा दाखल केला होता. खटल्या दरम्यान न्यायालयाकडून 11 साक्षीदार तपासण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















