दापोली : उद्योजक चंद्रकांत गोपीनाथ ऊर्फ तात्यासाहेब मेहता यांचं दुःखद निधन

banner 468x60

दापोली येथील मे. जी. बी. मेहता अँड सन्स या प्रसिद्ध पेट्रोल पंपाचे संस्थापक तथा ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत गोपीनाथ ऊर्फ तात्यासाहेब मेहता यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दापोली तालुक्यातील व्यापारी व सामाजिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

अत्यंत मनमिळावू स्वभाव, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून तात्यासाहेब मेहता यांची ओळख होती. त्यांनी आपल्या प्रदीर्घ व्यावसायिक कारकिर्दीत दापोलीच्या बाजारपेठेत विश्वासार्हतेचा आणि सातत्याचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मे. जी. बी. मेहता अँड सन्स या संस्थेने नावलौकिक मिळवला.

त्यांच्या निधनानंतर आज सकाळी १०.३० वाजता दापोली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून, दापोलीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात मेहता परिवाराचा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल दापोलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *