एम.ई.एस.ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि अमनोरा येस्स फाउंडेशनसिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक iBreastexam स्तन कर्करोग तपासणी मशीनचे उद्घाटन व प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या उपक्रमात यू ई लाईफ सायन्सेस प्रा.लि. यांचा सक्रिय सहभाग होता.
या कार्यक्रमाला परशुराम हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. सचिन उत्पात, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपम अलमान, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. दिप्ती चव्हाण, पंचकर्म विभाग प्रमुख डॉ. वृषाली स्वामी तसेच जनसंपर्क अधिकारी सुष्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर यू ई लाईफ सायन्सेस कंपनीच्या प्रतिनिधी गंधाली देसाई मॅडम व नीरजा साळेकर यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मशीनच्या वापराचे सविस्तर प्रशिक्षण दिले. यामध्ये मशीनची कार्यपद्धती, अचूक तपासणी प्रक्रिया, रुग्ण समुपदेशन तसेच अहवाल प्रणाली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सुमारे १०० महिलांची iBreastexam मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे व आजाराच्या प्रारंभिक अवस्थेतच निदान होणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यू ई लाईफ सायन्सेस प्रा. लि. यांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात स्तन कर्करोग पूर्वतपासणी, समुपदेशन व आरोग्य सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू आहे.
परशुराम हॉस्पिटल व अमनोरा येस्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले की, iBreastexam मशीन आता परशुराम हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार असून भविष्यात विविध ठिकाणी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक महिलांना वेळेत निदान व योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















