Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

banner 468x60

दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित दापोली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–२०२६ अत्यंत उत्साहात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

banner 728x90 banner 728x90

संघटनेची ही पहिलीच वक्तृत्व स्पर्धा असून, विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार जाणून घ्यावेत, त्यांच्या जीवनावर अधिक वाचन करावे आणि आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सर्व गटांतील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेचे निकाल

गट १ (इयत्ता १ली–२री):
प्रथम – इशा प्रशांत गुंदेकर (श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली)
द्वितीय – अलेक्स फिलिप गावित (श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली)
तृतीय – श्रेया शशिकांत शिर्के (मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)

गट २ (इयत्ता ३री–४थी):
प्रथम – शिवानी शामराव जवळगे (सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)
द्वितीय – आर्या ज्ञानेश्वर शिंदे (आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर, दापोली)
तृतीय – प्रज्ञा प्रशांत धुमाळ (मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)

गट ३ (इयत्ता ५वी–७वी):
प्रथम – सार्थक शिवराज रक्षे (ए. जी. हायस्कूल, दापोली)
द्वितीय – काव्या गणेश शेरे (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)
तृतीय – गार्गी भरत तुरे (मराठी मंदिर सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)

गट ४ (इयत्ता ८वी–१०वी):
प्रथम – काव्या दिलीप धामणे (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली)
द्वितीय – गौरी विकास माने (वराडकर हायस्कूल, मुरुड)
तृतीय – पूर्वी गजानन पावसे (व्ही. के. जोशी हायस्कूल, करजगाव)

मान्यवरांची उपस्थिती व पारितोषिक वितरण

पारितोषिक वितरण समारंभास संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, मेंटॉर्स अरुण गांधी, राहुल साबळे, आशिष मेहता, समीर गांधी, समीर तलाठी, सोहनी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अनिल शेठ, उपाध्यक्ष निकेत मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, सचिव मयुरेश शेठ, खजिनदार स्वप्निल मेहता, प्रकल्प संचालक प्रा. तेजस मेहता यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शर्मिला शिंदे मॅडम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

परीक्षक व आयोजन

स्पर्धेसाठी कैलास गांधी, कुणाल मंडलिक, अजिंक्य मुलुख, अनिरुद्ध सुतार, सुनील कदम, आदित्य रिसबुड, पार्थ सामल व कु. साखळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प संचालक प्रा. तेजस मेहता, सीए ऋषिकेश शेठ तसेच संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *