दापोली : कोकण कट्टा न्यूजच्या बातमीनंतर गंजलेला विजेचा पोल तातडीने हटवला Kokan katta News Impact

banner 468x60

दापोली–मंडणगड महामार्गावरील खोडा परिसरात पुलाजवळील मुस्लिम वस्तीत गंजलेल्या विजेच्या पोलमुळे अपघाताचे सावट निर्माण झाले होते. या धोकादायक परिस्थितीची दखल घेत कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले.

banner 728x90 banner 728x90

कोकण कट्टा न्यूजवर बातमी प्रसिद्ध होताच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पूर्णपणे गंजलेला व धोकादायक ठरलेला विजेचा पोल हटवला आहे.

दापोली–मंडणगड महामार्गालगत असलेल्या या वस्तीत वस्तीच्या मध्यभागी असलेला पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत होता. त्यामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या वातावरणात राहत होते.

महावितरणच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.
दापोली–मंडणगड महामार्गालगत असलेल्या या वस्तीत वस्तीच्या मध्यभागी असलेला पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत होता. त्यामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या वातावरणात राहत होते. महावितरणच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *