चिपळूण : आर.एच. वुमन हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवरून 1 लाख लंपास

banner 468x60

चिपळूण शहरातील मार्केडी येथील आर.एच. वुमन हॉस्पिटलमध्ये (RH Woman Hospital) चोरीची एक मोठी घटना घडली आहे. चोरट्याने थेट हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवर डल्ला मारत १ लाख रुपयांची रोकड लंपास केली.

banner 728x90 banner 728x90

या धाडसी चोरीमुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून चिपळूण पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:५३ वाजण्याच्या सुमारास घडली. मार्केडी येथील आर.एच. वुमन हॉस्पिटलचे कामकाज सुरू असताना, कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने रिसेप्शन काउंटरमध्ये प्रवेश केला.

चोरट्याने काउंटरमधील १ लाख रुपयांची रोकड, ज्यात ५०० रुपयांच्या २०० चलनी नोटा होत्या, त्या घेऊन पोबारा केला. हॉस्पिटलचे मालक आणि प्रसिद्ध डॉक्टर राकेश आप्पासाहेब हसबे (वय ३९ वर्षे) यांनी या चोरीबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३१ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली.

चोरट्याने ही चोरी अत्यंत धाडसाने केली असून, हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये चोरटा कैद झाला असण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या या परिसरातील सर्व कॅमेऱ्यांची तपासणी करत असून संशयितांची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *