युनायटेड मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे दि. २६ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जलतरण स्पर्धा वीर सावरकर जलतरण तलाव येथे पार पडल्या. या स्पर्धांमध्ये देशातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून ८०+ पर्यंतच्या वयोगटातील स्पर्धकांनी आपली क्रीडा कौशल्ये सादर केली.
स्पर्धेत ऍथलेटिक्स (थ्रोइंग प्रकार), पोहणे, बॅडमिंटन, लांब उडी, उंच उडी, पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल आदी क्रीडाप्रकारांचा समावेश होता. चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपाध्यक्षा तथा सुवर्णकन्या निशा आंबेकर यांनी ४५+ वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत थाळीफेक, गोळाफेक, हॅमर थ्रो तसेच ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रकारात एकूण ६ सुवर्णपदके पटकावली. याशिवाय कबड्डी स्पर्धेत रौप्यपदकही त्यांनी मिळवले.
त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे एप्रिल महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाविश्वातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















