शिवभक्त कोकण लोकनाट्य ‘नमन’चे दुबईत ऐतिहासिक सादरीकरण, कोकणची लोककला सातासमुद्रापार; मराठी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

banner 468x60

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणच्या गौरवशाली लोककला नमनचे दुबईत भव्य आणि ऐतिहासिक सादरीकरण पार पडले. कोकणची सांस्कृतिक परंपरा जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला.

banner 728x90 banner 728x90

या कार्यक्रमाचे आयोजन Inspire Event & Promotion यांनी केले होते. उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष सौजन्याने हा उपक्रम साकार झाला. कोकणची लोककला सातासमुद्रापार सादर व्हावी, या संकल्पनेला त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला.


कोकणात अनेक वर्षांपासून जपली जाणारी नमन ही लोककला दुबईत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांच्या पुढाकारामुळे परदेशात सादर झाली. दुबईतील मराठी रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रम शेवटपर्यंत ‘हाऊसफुल्ल’ राहिला, हे या लोककलेच्या लोकप्रियतेचे द्योतक ठरले.

या भव्य सादरीकरणासाठी एकूण २० कलाकार परदेशात सहभागी झाले होते. शिवभक्त कोकण लोकनाट्य – नमन या संचाने आपली परंपरा, शौर्यकथा, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे सादर करत रसिकांची मने जिंकली.

सर्जनशील व तांत्रिक संघ लेखन व दिग्दर्शन : निलेश किंजळकर, शाहीर : एकनाथ डिके
निर्माते : युयुत्सु आर्ते
सहाय्यक निर्माते : परेश देवरुखकर, दयानंद कुबल, जयवंत करंडे
कार्यकारी प्रमुख : केतन किंजळकर
गायक : कल्पेश जाधव
सूत्रधार : प्रथमेश भुवड कलाकार :
वैभव पडे, मदन पांडव, अनिल किंजळकर, विकास भुवड, परेश पतीये, प्रणय पानगले, साहिल डिके, मंदार खांबे
सचिन भडवलकर, सुनील भुवड, शैलेश भुवड
व्यवस्थापन : भस्मे, सुर्वे, शिंदे यांनी सहकार्य केलं.


कार्यक्रमानंतर लेखक व दिग्दर्शक निलेश किंजळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “कोकणची कला नमन दुबईत सादर करताना आपण परदेशात आहोत असे क्षणभरही वाटले नाही. येथील रसिकांनी दिलेले प्रेम, आपुलकी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मनाला भिडणारे होते. इतिहासात प्रथमच नमन परदेशात सादर झाले आणि ते पूर्णतः यशस्वी ठरले. एक कोकणी नमन कलाकार म्हणून ही अनुभूती आयुष्यभर स्मरणात राहील.”

कोकणच्या लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा हा कार्यक्रम सांस्कृतिक देवाणघेवाणीचा एक आदर्श नमुना ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांमुळे मराठी संस्कृतीचा ठसा अधिक व्यापक पातळीवर उमटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *