छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालयात आज (१९ फेब्रुवारी) उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित दिमाखदार पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाला परशुराम रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. अनुपम अलमाने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयातील अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रंथालय समिती व स्टुडंट्स काऊन्सिलने कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाला परशुराम रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉ. अनुपम अलमाने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रंथालय समिती व स्टुडंट्स काऊन्सिलने कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















