Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : 45 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

वेळणेश्वर येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल उमलू चव्हाण (वय ४५, मूळ रा. विजापूर, सध्या रा. वेळणेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजसमोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान मौजे वेळणेश्वर येथील एका माळरानावर ही घटना घडली.

मृत विठ्ठल चव्हाण यांनी दारूच्या नशेत असताना काजूच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संध्याकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.४२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.
या प्रकरणी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.४२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *