चिपळूण कोयना अभयारण्य येथील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ (एसटीआर ०६) वाघीण आता चिपळूणच्या माथ्यावरील जंगलांच्या दिशेने प्रवास करत असून, तिच्या हालचाली नांदिवसे परिसरातील डोंगरकपारीत आढळून आल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरकडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वन विभाग तातडीने सतर्क झाला आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी नांदिवसे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि खबरदारीच्या सूचना दिल्या.
डोंगराळ भागात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच रात्री विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागलवाडी परिक्षेत्रात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटीआर ०६ या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर ६ फेब्रुवारीला तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आणि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. त्यानंतर ‘हिरकणी’चा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला.
यापूर्वी एसटीआर ०३ हा ‘बाजी’ नर वाघ, तसेच ‘तारा’ आणि ‘चंदा’ या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल आहेत. आता ‘हिरकणी’च्या समावेशामुळे प्रजननवृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत सुमारे १,१६५ चौरस किलोमीटरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आणि अनेक दुर्मीळ प्रजातींचे अधिवास असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या परिसरात वाघांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवास मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
‘हिरकणी’च्या नांदिवसे परिसरातील एन्ट्रीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, पुढील काही दिवस या परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
‘हिरकणी’चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, वाघिणीच्या हालचालींवर सातत्याने जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावच्या डोंगराळ भागात जिथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द आहे. त्या परिसरात हिरकणीची एन्ट्री झाली आहे. परंतु, ग्रामस्थांना त्याचा कोणताही धोका नाही. येथील नागरिकांनी जंगलात जाऊ नये. तसेच, वाघ किंवा इतर कोणताही प्राणी दिसल्यास प्रथम वन विभागाशी संपर्क करावा असे साताप्पा सावंत, वनपाल चिपळूण यांनी सांगितले .

कोयना अभयारण्यातील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात सोडलेल्या हिरकणी वाघिणीची डरकाळी नांदिवसेच्या (ता. चिपळूण) जंगलात ऐकू आली आहे. हिरकणीच्या एन्ट्रीमुळे नांदिवसे परिसरात उत्सुकतेसोबतच कुतूहल निर्माण झाले आहे. येथील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
या संदर्भात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या ‘मॉनिटरिंग सेंटर’कडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वनविभाग तातडीने सतर्क झाला. बुधवारी सायंकाळी नांदिवसे गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पेच व्याघ्रप्रकल्पातील नागलवाडी परिक्षेत्रात ५ फेबुवारीला सायंकाळी पाच वाजता एसटीआर 06 या वाघिणीला पकडून कोयना अभयारण्यात सोडण्यात आले. त्यानंतर या वाघिणीचा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. या आधी एसटीआर 03 हा ‘बाजी’ नर वाघ तसेच ‘तारा’ व ‘चंदा’ या वाघिणी दाखल आहेत. आता त्यांच्या जोडीला नवीन आणलेली ही एसटीआर 06 म्हणजा ‘हिरकणी’ वाघीण कोयना वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रजननवृद्धीसाठी सोडण्यात आली आहे.
कोयना अभयारण्यात सोडलेल्या ‘हिरकणी’चा लोकेशन सिग्नल अवघ्या पाचव्या दिवशी नांदिवसेच्या डोंगराळ भागात आढळून आला. यानंतर मॉनिटरिंग सेंटरने चिपळूण वनविभागाला सावध केले. बुधवारी सायंकाळी वनाधिकाऱ्यांनी त्वरित पथकासह नांदिवसे येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी डोंगर परिसरात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्रीच्यावेळी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*