चिपळूण : पंचायत समिती शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे यांची निवड

banner 468x60

चिपळूण पंचायत समितीतील शिवसेना गटनेतेपदी. विनोद झगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना उपनेते तथा माजी आमदार. सदानंद चव्हाण साहेब यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छांसह अभिनंदन करण्यात आले.


यावेळी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संदेशबापू आयरे, तालुकाप्रमुख रुपेश घाग, पंचायत समिती सदस्या. पूजा जवरत–जावळे, पंचायत समिती सदस्य संजय जावळे, तालुका

समन्वयक दिलीप चव्हाण, माजी गटनेते राकेश शिंदे, विभागप्रमुख राजेश शिंदे, सुरेश गोलमडे, निलेश चावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.विनोद झगडे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत शिवसेनेची भूमिका अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *