चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून सलग दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
शहरातील खेंड विभागात राहणाऱ्या कुमार साहिल सचिन लकेश्री याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करताना तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, यापूर्वीच काल पेठमाप तांबटवाडी येथे एका विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.
कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात ती मुलगी गटारात पडून जखमी झाली. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सकाळी शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच कामावर जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत आहे.
विशेषतः खेंड, पेठमाप आणि आसपासच्या भागात कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















