खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात कर्मचाऱ्यांसाठी व्यापक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर एम.ई.एस.ए.एम. परशुराम रुग्णालय व संशोधन केंद्र आणि अमनोरा येस्स फौंडेशन सिटी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
या शिबिरात सिप्ला कंपनीच्या सहकार्याने सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांची ब्रीदोमेट्रिव्ह स्पायरोमेट्री (फुफ्फुस कार्यक्षमता) तपासणी करण्यात आली.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फुफ्फुसांची तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.तसेच आय ब्रेस्ट एक्जाम कंपनीकडून एमआयडीसीमधील महिला कर्मचाऱ्यांची तसेच अंगणवाडी सेविकांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. ही तपासणी परशुराम रुग्णालयाचे उपकेंद्र, बहाद्दूर शेख नाका, चिपळूण येथे पार पडली. सर्व तपासण्या पूर्णतः मोफत स्वरूपात करण्यात आल्या.आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तपासणी करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.औद्योगिक परिसरातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेसदर शिबीर डॉ. सचिन उत्पात (वैद्यकीय अधिक्षक), डॉ. अनुपम अलमान (उपवैद्यकीय अधिक्षक) तसेच विवेक कुलकर्णी (चीफ सोशल ऑफिसर, अमनोरा येस्स फौंडेशन सिटी ग्रुप, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
तपासणी करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
औद्योगिक परिसरातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेसदर शिबीर डॉ. सचिन उत्पात (वैद्यकीय अधिक्षक), डॉ. अनुपम अलमान (उपवैद्यकीय अधिक्षक) तसेच विवेक कुलकर्णी (चीफ सोशल ऑफिसर, अमनोरा येस्स फौंडेशन सिटी ग्रुप, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















