संगमेश्वर : शुक्रवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणार, विविध कामांसाठी महावितरणचा निर्णय

banner 468x60

महावितरणच्या संगमेश्वर उपविभागांतर्गत शुक्रवारी, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी तांत्रिक दुरुस्ती आणि सुधारणांच्या कामासाठी शहर व परिसरात सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये संगमेश्वर हायवे परिसरातील रोहित्राचे (ट्रान्सफॉर्मर) खांब उभे करणे, रोहित्राचे स्थलांतर करणे आणि संगमेश्वर बाजारपेठेला वीजपुरवठा करणारी पर्यायी केबल बदलणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.

banner 728x90 banner 728x90

या नियोजित कामामुळे संगमेश्वर शहरासह मौजे आणि कोंड असुर्डे परिसरातील वीजपुरवठा आठ तास बंद राहणार आहे.
वास्तविक, गुरुवारी बारावीची महत्त्वाची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही व्यत्यय येऊ नये, या सामाजिक जाणिवेने महावितरणने हे काम गुरुवारी न करता शुक्रवारी करण्याचे ठरवले आहे. तसेच शुक्रवारी संगमेश्वरची बाजारपेठ बंद असते, त्याचा विचार करून ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

या कामाबाबतची पूर्वकल्पना महावितरणकडून संगमेश्वर ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे. दरम्यान, तांत्रिक कामे निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा लवकर पूर्ववत केला जाऊ शकतो. ग्राहकांनी या दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण संगमेश्वर विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *