Breaking News
मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश चिपळूणमध्ये जुगार आणि दारुबंदीविरोधात पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हे दाखल मंडणगड : बाणकोट खाडीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला, मंडणगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

गुहागर : खेकडे पकडायला गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पांगारीतर्फे हवेली भूरकुंडा परिसरात खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली असून सायंकाळच्या सुमारास ती उघडकीस आली.

banner 728x90


असलम अब्दुल करीम दळवी (वय ५६, रा. पांगारीतर्फे हवेली भूरकुंडा, ता. गुहागर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा तोफिर असलम दळवी यांनी गुहागर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, असलम दळवी हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे खाडीत खेकडे पकडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र बराच वेळ लोटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळच्या सुमारास मुलगा तोफिर दळवी यांनी खाडी परिसरात शोध घेतला असता असलम दळवी हे खाडीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आले.
ही बाब तात्काळ गुहागर पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे भूरकुंडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून दळवी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *