चिपळूण एस.टी. स्टँड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण ते वीरबंदर जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या सॅकमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना गुरुवारी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी प्रज्ञा प्रशांत हरेकर (
वय ३८, व्यवसाय गृहिणी, रा. मुंडे तर्फे सावर्डे, पोरनाकवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्या एस.टी. स्टँडवरून चिपळूण–वीरबंदर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या काळ्या रंगाच्या सॅकची चैन उघडून परवानगीशिवाय सॅकमधील रोख रक्कम चोरून नेली.चोरीस गेलेल्या रकमेमध्ये प्रत्येकी ५०० रुपयांच्या १०० नोटांचे एकूण १० बंडल असून, एकूण रक्कम ५,००,००० रुपये असल्याचे
नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद रात्री १०.१५ वाजता करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी चिपळूण एस.टी. स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, एस.टी. स्टँडसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी रोख रक्कम व मौल्यवान वस्तू बाळगताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













