रत्नागिरी : सांडेलावगण येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगण (वाकणवाडी) येथे एका ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही बाब रविवार, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


संतोष यशवंत पवार (वय ३६, रा. सांडेलावगण वाकणवाडी, ता. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ राकेश यशवंत पवार यांनी पोलिसांना माहिती दिली. संतोष हा अविवाहित असून विभक्त अवस्थेत एकटाच राहत होता. सन २०१३ मध्ये झालेल्या अपघातात त्याचा एक पाय निकामी झाल्याने तो अपंग झाला होता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.


रविवार सायंकाळी राकेश पवार हे संतोष राहत असलेल्या खोलीलगतच्या देवघरातील दिवा लावण्यासाठी गेले असता, संतोष खोलीत छताच्या वाशाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *