गुहागर : शहर मर्यादित ‘एक वाडी – एक संघ’ नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन

banner 468x60

गुहागर शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीआळी यांच्या वतीने गुहागर शहर मर्यादित ‘एक वाडी – एक संघ’ चषक २०२६ अंतर्गत भव्य दिव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90

ही स्पर्धा शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी व रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कै. विठ्ठल रहाटे क्रीडा नगरी, संत संताजी जगनाडे महाराज मंदिराजवळ, गुहागर तेलीआळी येथे रात्री आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये गुहागर शहरातील प्रत्येक वाडीतील खेळाडूंना सहभागाची संधी देण्यात येणार असून, एक वाडी – एक संघ या संकल्पनेमुळे स्थानिक युवकांना आपले क्रिकेट कौशल्य सादर करण्याचे व्यासपीठ मिळणार आहे. सर्व सामने नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट या स्वरूपात खेळवले जाणार असून, प्रत्येक सामना चार घटकांचा असेल. प्रत्येक गोलंदाजाला एकच घटक टाकण्याची मुभा देण्यात आली आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक म्हणून रोख रक्कम रुपये १०,१११/- व आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक म्हणून रोख रक्कम रुपये ५,५५५/- व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना स्वतंत्र आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेची प्रवेश फी रुपये ७००/- प्रति संघ ठेवण्यात आली असून, संघांनी आपली प्रवेश फी दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कमिटीकडे जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धा रात्री ठीक ७.३० वाजता सुरू होणार असून पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. खेळाडूंनी आपल्या-आपल्या वाडीतूनच सहभाग नोंदवणे बंधनकारक असून गैरवर्तन किंवा गावाबाहेरील खेळाडू आढळल्यास संबंधित संघास बाद करण्यात येणार आहे.

स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचा वादविवाद करणाऱ्या संघास प्रवेश फी न देता स्पर्धेतून बाद करण्यात येईल, तसेच खेळाडूंना झालेल्या दुखापतीस आयोजक जबाबदार राहणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. काही अधिकार आयोजक कमिटीकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.

या स्पर्धेसाठी ऋषिकेश रहाटे, प्रशांत रहाटे, स्वप्निल राऊत, राकेश राऊत व रोशन यादव हे समन्वयक म्हणून काम पाहत असून, अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गुहागर शहरातील सर्व क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *