दापोली : मंदिरातील पूजासाहित्य लंपास, अज्ञातावर गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यातील बोरीवली–आडीवाडी येथील सातमाई नव्हणकरीण देवीच्या मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातील पितळी घंटा व तांब्याचे भांडे चोरून नेल्याचे उघड झाले आहे.

ही चोरी १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. चोरट्याने मंदिरात प्रवेश करून सुमारे ३ किलो वजनाची पितळी घंटा (अंदाजे किंमत ५,५०० रुपये) तसेच सुमारे २ किलो वजनाचे तांब्याचे पसरट भांडे (अंदाजे किंमत ३,५०० रुपये) असा एकूण ९,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी गजानन रामचंद्र देपोलकर (वय ५०, रा. बोरीवली–आडीवाडी) यांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.१२ वाजता दाभोल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाभोल पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *