जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना–भाजप–रिपब्लिकन पक्ष आघाडी (महायुती) उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा मंगळवार, ३ फेब्रुवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे.
शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. सोमवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे धावती भेट देत सभेच्या नियोजनाचा आढावा घेतला असून आवश्यक त्या सूचना माजी आमदार सदानंद चव्हाण यांना दिल्या.
या जाहीर सभेला भाजप नेते प्रशांत यादव, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष सतेश मोरे यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













