दापोली तालुक्यातील वावघर गुरववाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीचा झोपेत असताना श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
उदय रामचंद्र राऊत (वय ५५, रा. वावघर गुरववाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास उदय राऊत हे आपल्या घरी झोपेत असताना त्यांना अचानक तीव्र खोकल्याची उबळ आली. खोकल्याच्या झटक्यानंतर त्यांचा श्वास कोंडला गेला आणि ते बेशुद्ध पडले.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पहाटे सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे वावघर गुरववाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उदय राऊत यांच्या पश्चात कुटुंबीय असून त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













