मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या सर्व्हिस रोडवर एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी मुंबईतील एका तरुणावर गुन्हा दाखल केला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
फिर्यादी राजेंद्र कुमार जगन्नाथ वाघमारे (वय ४३, रा. वेरळ, खेड) हे २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलने (MH-08-N-6246) वेरळ ते खेड आगार अशा प्रवासाला निघाले होते. वेरळ येथील जगबुडी नदीच्या कडेने असलेल्या सर्व्हिस रोडवरून ते मुख्य रस्त्याकडे येत असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
आरोपी प्रिन्स मनोज गुप्ता (वय २५, रा. गोरेगाव, मुंबई) हा आपली ‘केटीएम’ दुचाकी (MH-47-BX-3056) अतिवेगाने आणि बेदरकारपणे चालवत होता. रस्त्याची परिस्थिती आणि वळण लक्षात न घेता त्याने वाघमारे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
या भीषण अपघातात राजेंद्र वाघमारे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर जखमी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खेड पोलिसांनी २९ जानेवारी रोजी आरोपी प्रिन्स गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













