दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण

banner 468x60

कोकणातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात सध्या उनाड गुरांच्या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ, आझाद मैदान परिसर आणि एसटी स्टँड परिसरात मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे स्थानिक व्यापारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आणि कापड दुकानांच्या बाहेर मांडलेल्या मालावर ही गुरे ताव मारतात. अनेकदा दुकानांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे काचांची तावदाने फुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
​वाहतुकीस अडथळा:

रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या गुरांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणे कठीण होते, ज्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. अनेकदा ही गुरे आपापसात भिडतात, ज्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आणि विशेषतः लहान मुलांना दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *