Breaking News
चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

खेड : बेपत्ता व्यक्तीचा जगबुडी नदीपात्रात आढळला मृतदेह

banner 468x60

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुडोशी येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज जगबुडी नदीच्या पात्रात तरंगताना मिळून आला आहे.

काशीनाथ रामचंद्र झोरे (रा. कुडोशी खापरेवाडी, ता. खेड) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ झोरे हे २० जानेवारी २०२६ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते.

मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी मनीषा काशीनाथ झोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच, आज २३ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कुडोशी गवळटेप येथील जगबुडी नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती समोर आली.

ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो काशीनाथ झोरे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खेड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *