Breaking News
रत्नागिरी : मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, अचानक चक्कर येऊन कोसळला 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी? चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक

रत्नागिरी : साळवी कुटुंबाकडून दुर्मिळ प्रजातीच्या घुबड पक्षाला जीवदान

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या येथील साळवी कुटुंबाने दुर्मिळ प्रजातीच्या घुबड पक्षाला जीवदान दिले. मिऱ्या येथील जाकीमिऱ्या येथे पांढऱ्या रंगाचा घुबड पक्षावर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यातून सोडवत वन विभागाच्या स्वाधीन केले.


दोन दिवसांपूर्वी ही घटना मिऱ्या येथील जाकीमिऱ्या येथे घडली. दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाचा घुबड पक्षावर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता. ही बाब नजीकच राहणाऱ्या साळवी कुटुंबाच्या निदर्शनास आली. यावेळी सुधीर साळवी, प्रणिता साळवी आणि रूपेश सावंत यांनी तत्काळ धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून घुबड पक्षाची सुटका केली.

यानंतर घुबड पक्षाला घरी घेऊन जात त्याच्या जखमा साफ केल्या. दुसऱ्या दिवशी साळवी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. शुक्रवारी दुपारी वन विभागाचे अधिकारी मिऱ्या येथे साळवी यांच्या घरी पोहचले. साळवी यांच्याकडून घुबडाचा ताबा घेत त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. साळवी यांनी पक्षी प्रेमामुळे मिऱ्या येथील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *