दापोलीत भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्ररोग तपासणीचा लाभ घ्यावा – डॉ. बासित पारकर यांचं आवाहन

banner 468x60

दापोली शहरात नागरिकांच्या नेत्र आरोग्यासाठी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्र शल्यचिकित्सक डॉ. बासित ए. रहीम पारकर (MBBS, MS – Ophthalmology) यांनी केले आहे.

https://maps.google.com/?q=17.755692,73.193283

हे मोफत नेत्र तपासणी शिबिर पारकर आय क्लिनिक – फॅको मोतीबिंदू व लेझर सेंटर, दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डोळ्यांची सविस्तर तपासणी करण्यात येणार असून, दृष्टीदोष, मोतीबिंदू, डोळ्यांचा ताण, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ तसेच इतर नेत्रविकारांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे.

२६ जानेवारी सोमवारी गाळा क्रमांक ७ आणि ८, खालिद कॉर्नर बिल्डिंग, स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या खाली पारकर आय क्लिनिक, फॅको मोतीबिंदू व लेझर सेंटर याठिकाणी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.

सध्याच्या काळात मोबाईल, संगणक व स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नेत्रविकारांचे प्रमाण वाढत आहे.

अशा परिस्थितीत वेळेवर तपासणी व योग्य उपचार अत्यंत आवश्यक असल्याने या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असेही डॉ. पारकर यांनी सांगितले. या मोफत शिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराची माहिती पुढीलप्रमाणे :

🔹 शिबिर : मोफत नेत्र तपासणी
🔹 डॉक्टर : डॉ. बासित ए. रहीम पारकर
    MBBS, MS (Ophthalmology) – नेत्र शल्यचिकित्सक
🔹 ठिकाण : पारकर आय क्लिनिक, फॅको मोतीबिंदू व लेझर सेंटर
🔹 पत्ता :
गाळा क्रमांक ७ आणि ८, खालिद कॉर्नर बिल्डिंग,
स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या खाली,
दापोली केमिस्टच्या पुढे,
एस.टी. स्टँडच्या मागे, दापोली
🔹 वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी २.००
🔹 संपर्क :
📞 ९९२२३८८६६९
📱 ८४४६८६२७६५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *