दापोली शहरातील रसिकरंजन नाट्यगृहाच्या परिसरातून एक पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालगाव येथील रहिवासी आणि व्यवसायिक कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र काशिनाथ चव्हाण यांनी आपली सुझुकी एक्सेस १२५ सीसी (क्रमांक MH 08 AS 8996) २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रसिकरंजन नाट्यगृहाशेजारी असलेल्या श्री समर्थ अर्थमुव्हर्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. काही वेळाने ते परतले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही.
परिसरात सर्वत्र शोध घेऊनही गाडीचा पत्ता न लागल्याने, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी ही ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची खात्री त्यांना पटली. या घटनेनंतर चव्हाण यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दिवसाढवळ्या नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणावरून दुचाकी चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















