Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश चिपळूणमध्ये जुगार आणि दारुबंदीविरोधात पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हे दाखल

गुहागर : पत्रकार प्रणव पोळेकर यांना कोंडकारुळ पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर

banner 468x60

वेळणेश्वर कोंडकारुळ पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या वतीने पत्रकार प्रणव पोळेकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रणव पोळेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

banner 728x90

सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखणीच्या माध्यमातून ठामपणे आवाज उठवणारे प्रणव पोळेकर आता थेट लोकसेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास, शेतकरी, युवक तसेच सामान्य नागरिकांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडण्याचे कार्य त्यांनी आजवर केले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांना कोंडकारुळ पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू नेतृत्व आणि जनतेशी थेट संवाद हे प्रणव पोळेकर यांच्या उमेदवारीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी कोंडकारुळ गणातील पाणीप्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, शिक्षण व आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देणार असल्याचे स्पष्ट केले.“सामान्य जनतेचा विश्वास आणि पाठबळ हेच माझे खरे भांडवल आहे. कोंडकारुळ गणातील

प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे,” असे प्रणव पोळेकर यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या उमेदवारीमुळे कोंडकारुळ पंचायत समिती गणातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात निवडणुकीच्या प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *