येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून आज अर्ज सादरीकरणाच्या तिसऱ्या दिवशी दापोली तालुक्यात पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

तालुक्यातील कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाकर गोलांबडे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाकर गोलांबडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.
दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी दिवसांत विविध पक्षांचे उमेदवार आपले अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक रणधुमाळीला अधिकृत सुरुवात झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, छाननी प्रक्रिया आणि माघार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळात दापोली तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*