गुहागर : असगोली जि. प. गटातून विक्रांत जाधव यांना उमेदवारी जाहीर

banner 468x60

गुहागर असगोली जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवावर, प्रशासकीय कामकाजातील कार्यक्षमतेवर आणि संघटनात्मक क्षमतेवर विश्वास ठेवत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विक्रांत जाधव यांनी ग्रामीण विकासाला विशेष प्राधान्य दिले. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व स्वच्छता यांसह शेतकरी आणि युवकांसाठीच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

उमेदवारी जाहीर होताच असगोली गटासह संपूर्ण परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत करत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

आगामी निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला आहे. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांची साथ लाभल्यास असगोली जिल्हा परिषद गटात विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *