Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश चिपळूणमध्ये जुगार आणि दारुबंदीविरोधात पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हे दाखल

गुहागर : ॲड. जोत्स्ना विनय काताळकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश , शीर गणासाठी उमेदवारी जाहीर, भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेला जय महाराष्ट्र

banner 468x60

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावच्या शिवसेना (शिंदे गट) युवतीसेना तालुका प्रमुख तसेच वकील आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या ॲड. जोत्स्ना विनय काताळकर यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

banner 728x90

यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे सेनेत घरवापसी करणाऱ्या ॲड. काताळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच गुहागर पंचायत समितीच्या शीर गणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ॲड. जोत्स्ना विनय काताळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

ॲड. काताळकर यांच्या प्रवेशामुळे गुहागर तालुक्यात ठाकरे सेनेला बळकटी मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *