चिपळूण : मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, कापसाळ येथील एका पदाधिकाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण येथील भाजप पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर अल्पवयीन मुलीशी संबंधित कथित प्रकरणात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम (वय २७, रा. कापसाळ, ता. चिपळूण) असे संशयित आरोपीचे नाव असून, तो सध्या चिपळूण पोलिसांच्या ताब्यात आहे.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत संबंधित अल्पवयीन मुलीसोबत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सदर बाबी तपासाअंती स्पष्ट होणार आहेत.


त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेऊन गर्भवती केले. पीडित मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ६४ (२), ६५ व ६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संशयित पोलिस कोठडीत असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.


अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच तपास प्रक्रियेवर परिणाम होऊ नये यासाठी अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत.
इतर बाबींबाबत तपास सुरू


संशयित व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध असल्याची माहिती समोर आली असून, या संदर्भात कोणतीही निष्कर्षात्मक भूमिका न घेता पोलिसांकडून सर्व बाबींची स्वतंत्र व कायदेशीर चौकशी करण्यात येत आहे.

तपासादरम्यान काही मुद्दे समोर आल्याची प्राथमिक माहिती असून, त्याबाबत पुढील कार्यवाही तपासानंतर ठरविण्यात येणार आहे. या प्रकरणाबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *