संगमेश्वर : सोनवडे बौद्धवाडीत ध्वजस्तंभाची तोडफोड

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे बौद्धवाडी येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ध्वजस्तंभाची अज्ञाताने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी अज्ञातावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेंसिक लॅब यांना शनिवारी पाचारण करण्यात आले.


सोनवडे बौद्धवाडी येथे ध्वजस्तंभाची अज्ञाताने शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तोडफोड केली. मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. याची माहिती तत्काळ देवरुख पोलिसांना देण्यात आली. यानुसार देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. तोडफोड झाल्याचा प्रकार त्यांच्याही निदर्शनास आला. डोळ्यात तेल घालून रात्रभर देवरूख पोलीस यंत्रणा पहारा देत होती.


या घटनेचा तपास करण्यासाठी शनिवारी सकाळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेंसीक लॅब यांना पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. दिवसभर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व देवरूख निरीक्षक उदय झावरे राखीव सुरक्षा दलासह तैनात होते. सायंकाळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे देखील पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने स्तंभ पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *