Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : ट्रेलरने आणि दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी बावनदी येथील धोकादायक उताराने पुन्हा एकदा भीषण अपघाताचे रूप धारण केले. भरधाव वेगातील ट्रेलरने आधी दुचाकीला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी

banner 728x90

(दि. १५) रात्री ११.१५ च्या सुमारास घडली. या अपघातात प्रणय रविंद्र काडगे (वय…, रा. शिरवली, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर चालक मोहम्मद कासिम इलियाज खान (४८, रा. बिहार) हा गोव्यातून मुंबईच्या दिशेने ट्रेलर (क्र. MH 01 EM 2951) घेऊन भरधाव वेगाने जात होता. निवळी बावनदी येथील उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने समोर चाललेल्या दुचाकीला (क्र. MH 42 BT 4710) पाठीमागून जोरदार धडक दिली.

त्यानंतर ट्रेलर पुढे घसरत जाऊन बावनदीच्या बाजूकडून येणाऱ्या टेम्पोला (क्र. MH 07 AJ 4324) समोरून धडकला. या धडकेत टेम्पो चालक प्रणय काडगे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या प्रकरणी निवळी येथील संजना संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयगड पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, या अपघाताची अधिकृत नोंद शुक्रवारी (दि. १६) पहाटे ४.१४ वाजता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *