Breaking News
रत्नागिरी : मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, अचानक चक्कर येऊन कोसळला 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी? चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक

रत्नागिरी : गावखडी येथे दुचाकीची एसटीला धडक

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी कासार पऱ्या या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून एसटीला ठोकर देवून अपघात करण्याऱ्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत शामराव फोडकर (वय २५, रा. कशेळी-भंडारवाडी, ता. राजापूर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावखडी-कासार पऱ्या येथील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुशांत फोडकर हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बी.जे ८३९७) घेऊन गोळप ते कशेळी असे जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरुन येणारी एसटी (क्र. एमएच-२० बी एल ३३१२) च्या चालक बाजूकडील मागील चाकाला ठोकर देवून अपघात केला. या अपघातामध्ये दुचाकी स्वार सुशांत फोडकर हे जखमी झाले. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रद्धा करळकर यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *