Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

देवरुख : रिक्षा 10 फूट खोल पऱ्यात कोसळली, दोन महिला जखमी

banner 468x60

करंबेळे-देवरुख (ता. संगमेश्वर) येथे रिक्षावरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह त्याची पत्नी व आई जखमी झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेदहाच्या सुमारास करंबेळे रस्त्यावर घडली.

banner 728x90


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक साईप्रसाद महादेव लिंगायत हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ७९७७) सोबत पत्नी सई व आई रेश्मा यांना घेऊन देवरुख येथे जात होता. करंबेळे रस्त्यावर अचानक त्याचा रिक्षावरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये चालक साईप्रसाद याच्यासह पत्नी व आई जखमी झाली. तात्काळ त्यांना उपचारासाठी देवरुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना सुरुवातीला देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *