Breaking News
रत्नागिरी : मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, अचानक चक्कर येऊन कोसळला 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी? चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक

रत्नागिरी : उपनगराध्यक्षपदी भाजपाचे समीर तिवरेकर

banner 468x60

रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी झाली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे.


स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या उपनगराध्यक्षपदासाठी समीर तिवरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.. तिवरेकर यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात समन्वय राखण्यासाठी तिवरेकर यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठीदेखील एकमत झाले. यामध्ये प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी माजी नगराध्यक्ष म्हणून असलेला दांडगा अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अभि दुड्ये शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांनी या पदावर वर्णी लावली आहे. भाजपच्या वतीने संदीप ऊर्फ बाबू सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी एकमताने निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *