चिपळूण तालुक्यातील भराडे येथील व्यापारी विलास महादेव चव्हाण (५०) या बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सोमवारी दुपारी ४ वाजता वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. शिरगाव पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
त्यांनी आत्महत्या केली की अन्य काही प्रकार घडला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. विलास चव्हाण हे शुक्रवारी ( २ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेले होते. त्याबाबत त्यांची पत्नी विनया विलास चव्हाण यांनी अलोरे शिरगाव पोलिस स्थानकात बेपता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याबाबत शिरगाव पोलिसांकडून चौकशी सुरू असताना त्यांची दुचाकी पिंपळी येथे वाशिष्ठी कॅनॉलच्या पुलाजवळ चावीसह दिसून आली.
मात्र त्यांचा कुठेही तपास लागला नाही. त्यांच्याकडे मोबाइल नसल्यामुळे त्यांचे लोकेशन दिसून येत नव्हते. अशातच वाशिष्ठी नदीपात्रात गांधारेश्वर दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सायंकाळी उशिरा विच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील असा परिवार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*