Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : हॉटेलच्या रूमचे छत कोसळून दाम्पत्य जखमी, ‘चिरा मिडोस’च्या मालकावर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून आलेल्या एका कुटुंबावर हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या या घटनेत पती-पत्नी जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

banner 728x90 banner 728x90

याप्रकरणी हॉटेल ‘चिरा मिडोस’च्या (Hotel Chira Meadows) मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड येथील विकास तिवारी (वय ४८) हे आपल्या पत्नी साधना तिवारी आणि मुलासह सुट्ट्या घालवण्यासाठी दापोलीला आले होते.

त्यांनी दापोली तालुक्यातील जालगाव येथील ‘हॉटेल चिरा मिडोस’ मध्ये रूम नंबर १०६ बुक केली होती. ३० डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.२० (००.२०) वाजण्याच्या सुमारास तिवारी कुटुंब रूममध्ये असताना अचानक छताचा मोठा भाग खाली कोसळला. हे छत थेट विकास तिवारी, त्यांची पत्नी आणि मुलाच्या अंगावर पडले. या घटनेत विकास तिवारी आणि त्यांची पत्नी साधना तिवारी (वय ४५) यांना दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांना रूमचे छत मोडकळीस आल्याची आणि ते पडू शकते याची पूर्णपणे जाणीव होती. त्यांनी ही धोकादायक रूम फिर्यादींना भाड्याने दिली. तसेच, हॉटेलच्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरने छताचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा अपघात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादी विकास तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी हॉटेल मालक डॉ. राजेंद्र जगदाळे आणि अज्ञात बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम १२५ (अ) (दुसऱ्याचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) आणि ३(५) (संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे (गुन्हा रजिस्टर नंबर २४६/२०२५). पर्यटकांनी गजबजलेल्या दापोलीत हॉटेलमधील अशा बेजबाबदार कारभारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *