दापोली : 99व्या साहित्य संमेलनात दापोलीचा मान; कैलास गांधी यांना विशेष सन्मान

banner 468x60

सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दापोलीच्या साहित्यविश्वाला मानाचा गौरव मिळाला आहे. दापोली येथील ज्येष्ठ कवी व गझलकार कैलास गांधी यांना संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या कवीसंमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले असून ते २ जानेवारी २०२६ रोजी कोकणाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

banner 728x90


तसेच, ३ जानेवारी २०२६ रोजी गझल कट्ट्यावर होणाऱ्या ६व्या गझल मुशायऱ्याच्या अध्यक्षपदाचा मानही कैलास गांधी यांना देण्यात आला आहे.


या चार दिवसीय संमेलनात परिसंवाद, कवीसंमेलन, काव्य कट्टा, गझल कट्टा, ग्रंथ प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२६ रोजी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मुख्य मंचावर होणाऱ्या पहिल्या कवीसंमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर भूषवणार असून, निमंत्रित कवी म्हणून कैलास गांधी सहभागी होणार आहेत.


तसेच, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या गझल कट्ट्यावरील ६व्या गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार संदीप पटेल करणार असून, राज्यभरातील नामवंत गझलकार या मुशायऱ्यात सहभागी होणार आहेत.
दापोलीच्या साहित्यिकाला मिळालेला हा सन्मान कोकणातील साहित्यप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *