दापोली : जे.सी.आय. दापोली आणि दशानेमा गुजर युवक संघटनेतर्फे पत्रकार गौरव सोहळ्याचे आयोजन

banner 468x60

समाजातील सत्य, संवेदनशीलता व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे भान जपत निष्पक्ष व निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजजागृती करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यासाठी दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली व जे.सी.आय. दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने “शब्दशिल्पकारांचा सन्मान – पत्रकार गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.


हा गौरव सोहळा बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दापोली येथील पितांबरी रिसॉर्ट येथे संपन्न होणार आहे. समाजोपयोगी, निर्भीड व जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकार बांधवांचा यावेळी कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. कुणाल मेहता (अध्यक्ष, दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली व अध्यक्ष (नूतन) – जे.सी.आय. दापोली २०२६), श्री. निकेत मेहता (उपाध्यक्ष). ऋषिकेश तलाठी (कार्याध्यक्ष),. मयुरेश शेठ (सचिव),
. स्वप्नील मेहता (प्रकल्प संचालक व खजिनदार) यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी सक्रिय सहभाग घेत आहेत.

तसेच जे.सी.आय. दापोलीचे अध्यक्ष फराज रखांगे (२०२५), सचिव तेजस मेहता (२०२५), सचिव (नूतन) रोशन वेदक (२०२६) व खजिनदार सी.ए. ऋषिकेश शेठ (२०२५–२०२६) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या गौरव सोहळ्याला पत्रकार बांधव, मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *