BIG NEWS जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांची घोषणा 5 जानेवारीला होण्याची शक्यता

banner 468x60

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा 5 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची माहिती मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहे.

banner 728x90 banner 728x90

पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा असणार असून, राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू होण्याची चिन्हे असून, राजकीय पक्ष आणि उमेदवार तयारीला लागले आहेत. आगामी काळात ग्रामीण राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *