खेड : संगलट गावची कन्या डॉ. फलाह नाडकर यांचे वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश

banner 468x60

खेड तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र मझहर उमर नाडकर यांची कन्या डॉ. फलाह मझहर नाडकर हिने वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. फलाह यांनी २०२४ साली सांगली येथील प्रकाश मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी पूर्ण केली आहे.


एमबीबीएसनंतर त्यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवत के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, मुंबई येथे एम.डी. (अ‍ॅनेस्थेशिया) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संगलट गावासह संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

banner 728x90 banner 728x90


डॉ. फलाह यांच्या या यशामागे त्यांचे वडील मझहर उमर नाडकर यांचेही मोलाचे योगदान आहे. मझहर नाडकर हे पेशाने अभियंता असून सध्या मुंबईत प्रख्यात बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखले जातात.


डॉ. फलाह नाडकर यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *