दाभोळ-दापोली रोडवरील झाडी काढण्याचे काम नागरिकांच्या स्वखर्चातून, बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Screenshot

banner 468x60

दापोली–दाभोळ रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी आणि गवत वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. सदर रस्त्याची देखभाल व झाडी काढण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोली यांच्याकडे असतानाही प्रत्यक्षात हे काम विभागामार्फत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

चिखलगाव परिसरातील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी एकत्र येत स्वतःच्या खर्चाने झाडे व झाडी काढण्याचे काम केले. रस्ता सुरक्षित राहावा आणि नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने नागरिकांनी पुढाकार घेतला असला तरी यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकारच्या कामांसाठी शासनाकडून नियमित निधी उपलब्ध होत असल्याची माहिती असताना प्रत्यक्षात नागरिकांना स्वतः पैसे खर्च करावे लागत असतील, तर मंजूर निधीचा वापर नेमका कसा आणि कुठे होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून संबंधित विभागाने याबाबत खुलासा करावा, तसेच दापोली–दाभोळ रोडवरील झाडी काढण्याचे काम तातडीने आणि नियमितपणे करावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *