चिपळूण : शहरात आयटी अभियंत्याची आत्महत्या

banner 468x60

चिपळूण शहरातील पागमळा परिसरात असलेल्या एकता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत आशिष किरण शेडगे (वय ४०, मूळ रा. आकुर्डी, पुणे) यांचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आशिष शेडगे हे पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी चिपळूण येथे नोकरी करत असून ते पत्नी व दोन मुलांसह येथे वास्तव्यास होते.


बुधवारी रात्री घरी आल्यानंतर आशिष यांनी मद्यसेवन केल्याची माहिती आहे. त्यानंतर पत्नी व मुले जेवण करून झोपी गेल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी गळफास घेतल्याचे सकाळी उघडकीस आले. पत्नीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत फासाची दोरी कापली; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.


या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *