Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : शहरात पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा, नवानगर परिसरात मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली

banner 468x60

दापोली शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन नवानगर परिसरात अचानक फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सदर पाईपलाईन दुरुस्तीचे काम दापोली नगर पंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, पुढील दोन दिवस शहरातील नागरिकांना कमी दाबाने तसेच अनियमित वेळेत पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

नवानगर परिसरातील पाईपलाईन फुटल्याचे निदर्शनास येताच नगर पंचायत प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, अनावश्यक पाणी वापर टाळावा तसेच उपलब्ध पाण्याचा जपून उपयोग करावा, असे आवाहन दापोली नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सहकार्यामुळे दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती देत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन दापोली नगर पंचायत, दापोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *