महाबळेश्वर येथे सह्याद्री क्लासिक सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दोन घाट’ पुरुष खुला गट सायकल स्पर्धेत चिपळूणच्या अथर्व भोसलेने अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. याचबरोबर मुंबई सायकलोथॉन स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक मिळवला असून, केवळ दोन सेकंदांच्या फरकाने तो तिसऱ्या स्थानापासून दूर राहिला.
अथर्वच्या या यशामागे वडील हेमंत यशवंत भोसले यांचा व्यावसायिक सायकल स्पर्धांतील अनुभव व मार्गदर्शन तसेच ८० वर्षीय आजोबा यशवंत पांडुरंग भोसले यांचा सायकल चालवण्याचा वारसा लाभला आहे. या कुटुंबीयांच्या प्रेरणेने अथर्व सातत्याने प्रगती करत असून, नजीकच्या भविष्यात चिपळूण सायकलिंग क्लबच्या मार्गदर्शनाखाली तो चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सायकलिंग क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
महाबळेश्वर येथे झालेल्या या स्पर्धेत चिपळूण सायकलिंग क्लबने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लक्षणीय यश मिळवले आणि संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला.
आजच्या डिजिटल युगात अनेक मुले मोबाईलच्या आहारी जात असताना, अथर्वने सायकलिंगसारख्या मैदानी खेळात स्वतःला झोकून दिले आहे. यानिमित्ताने बोलताना अथर्वचे वडील हेमंत भोसले म्हणाले, “पालकांनी आपल्या पाल्यांच्या आवडीनुसार त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व मैदानी खेळांकडे आकर्षित करावे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवायचे असतील तर शासनाने होतकरू खेळाडूंना मार्गदर्शन व अर्थसहाय्य द्यावे; अन्यथा नैसर्गिक कौशल्य वाया जाते.”
या यशप्राप्तीत चिपळूण सायकलिंग क्लबचा मोलाचा वाटा असल्याचे अथर्वने नमूद केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















