Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : चौकशी केल्याच्या रागतून मारहाण 18 जणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

मंडणगड येथे माहिती मिळवण्यासाठी केलेल्या तक्रारींचा राग मनात धरुन १८ जनांनी माराहाण केल्याची तक्रार संजय बाबूराव राणे (वय ६०) राहणार आदर्श नगर मंडणगड यांनी ११ डिसेंबर रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

banner 728x90 banner 728x90

तक्रारीनुसार राहूल कोकाटे, रुपेश साळुंखे, सौरव लेंडे, हेमंत दिवेकर, संतोष दिवेकर, दत्ताराम यादव, नितीन लेंडे, सतिश गोठल, रणवीर लेंडे, वीरेंद्र घोसाळकर, ओमकार लेंढे, धर्मेश रटाटे, सुहास घोलप, राजा पारेख, विद्या कोकाटे, शिवप्रसाद कामेरीकर, समिर लेंडे, विशाल कोकाटे सर्व राहणार मंडणगड या संशयितांविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटने संदर्भात फिर्यादीने नोंदवलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता फिर्यादी हे नगर पंचायत मंडणगड येथे त्यांनी दिलेल्या व्यापारी संकुलाच्या माहीती अधिकाराची चौकशी करण्याकरिता गेले होते. यावेळी घटनेतील संशयित क्रमांक १ याने फिर्यादी यांस तु आमच्याबद्दल नेहमी तक्रार करतो, आम्हाला त्रास करतोस असे बोलून मनात राग धरुन फिर्यादी यांस मारहाण करण्यास सुरुवात सुरुवात केली.

या प्रकरणी फिर्यादी व त्यांची पत्नी यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *